गोविंद ग. हांडे(कृषि
प्रक्रिया व व्यापारक्षम शेती,)
राज्यातून मोठया प्रमाणात औद्योगिक साहित्य लाकडी पॅकींगद्वारे
निर्यात केली जाते. तसेच कंटेनरद्वारे कृषि माल निर्यातीकरीता
सुध्दा लाकडी पॅलेटचा वापर केला जातो. लाकडी पॅकींगद्वारे किडी व
रोगाचा प्रसार होवू नये म्हणून
International Standards for phytosanitory measures-15 (ISPM-15)
नुसार लाकडी पॅकींगकरीता मिथाईल ब्रोमाईड चे धुरीकरण किंवा हॉट
वॉटर ट्रिटमेंट करुन तसे लाकडी पॅकींग मटेरियलवर स्ट्रॅपिंग करणे
बंधनकारक करण्यात आलेले आहे व त्याची अमलबजावणी प्रगतशिल
देशामार्फत करण्यात येत आहे.
(ISPM-15)
आयएसपीएम-१५ म्हणजे काय
?
आंतरराष्ट्रीय प्रमाणके स्वच्छता उपाययोजना-१५
एका देशातुन दुस-या देशास कृषि मालाची आयात व निर्यात करण्याकरीता
सन १९५१ मध्ये आंतरराष्ट्रीय पिक सरक्षण करार
International Plant Protection cornetin (IPPC)
करण्यात आलेला आहे. सदर कराराचे १७० सदस्य देश असुन भारत ही सदर
कराराचा एक सदस्य देश आहे.
आंतरराष्ट्रीय
पिक
संरक्षण कराराचा
उद्देश
(IPPC)
एका देशातुन दुस-या देशात मालाचा आयात व निर्यातीद्वारे किड,रोग
व तणाचा प्रसार होवू नये. तसेच त्यापासुन मानव,
प्राणी व पिकांना बांधा होणार नाही,
हा मुख्य उद्देश आहे. सर्व सदस्य देशाना सदर
कराराचे पालन करणे बंधनकारक आहे.
खुल्या जागतिक बाजारपेठेमुळे आयात व निर्यातीच्या
संधी निर्माण झाल्यामुळे एका देशातुन दुस-या देशांना आयात व
निर्यातमध्ये वाढ होत आहे. याचा विचार करुन आयात व निर्यातीद्वारे
रोग व किडीचा प्रसार होवू नये या दृष्टिकोनातुन
(IPPC)
करारामध्ये सन- १९९७ मध्ये समिती स्थापन करुन सदर
समितीद्वारे १८ उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये
(ISPM-15)
नुसार लाकडी पँकींग करीता मिथाईल ब्रोमाईड या किडनाशकाची धुरीकरण
किंवा हॉट वॉटर ट्रिटमेंट करणे आवश्यक करण्यात आलेले आहे.
लाकडी
पॅकींग
करीता प्रामुख्याने
खालील
लाकडाचा वापर
केला जातो.
१.
टिक वुड
२.
रबर वुड
३.
पाईन वुड
४.
ब्रम्हा वुड
५.
सिल्व्हर वुड
लाकडी पॅकींग साहित्यास प्रामुख्याने वुड बोरर व वाळवी या किडीचा
प्रादुर्भाव होतो. तसेच बुरशीचाही प्रादुर्भाव होतो. सदर किडी
रोगाचे नियंत्रणाकरीता
?आंतरराष्ट्रीय
प्रमाणके स्वच्छता
उपाययोजना
-१५?
मधील मार्गदर्शन सुचना नुसार लाकडी पॅकींग मटेरियलला मिथाईल
ब्रोमाईड या किडनाशकाची धुरीकरण करुन तसे केल्याचे लाकडी पॅकींगवर
पक्याशाईने नमुद करणे आवश्यक आहे. खालीलप्रमाणे मार्क केले जाते.

धुरीकरण
कोणाकडून
करुन
घेणे
आवश्यक आहे.
(ISPM-15)
नुसार लाकडी पँकींग मटेरियलला धुरीकरणे करण्यासाठी केंद्र शासनाने
National Plant Protection Organisation (NPPO)
अंतर्गत पिक संरक्षण सल्लागार,भारत
सरकार फरिदाबाद यांना
Fumigation
Operation
चा परवाना देण्याचा अधिकार दिलेले आहेत. सदर परवाना देताना
Methyl
Bromide
चे
fumigation
तंज्ञ व्यक्तिच्या मार्गदर्शनाखाली
करण्यासाठी तंज्ञ व्यक्तिची नियुक्ती करुनच
(ISPM-15) Methyl bromide fumigation
करण्याचा परवाना दिला जातो. सद्या देशात १७०
परवाना धारक असुन राज्यात
२३ अधिकृत परवानाधारक आहेत.
लाकडी पँकींग मटेरियला मिथाईल ब्रोमाईडची धुरीकरण अधिकृत परवाना
धारकाकडून करुन घेवून विहित नमुण्यात प्रमाणपत्र घेतल्यानंतर
संबधीत
PSC Authority
कडून संबधीत आयातदार
देशाच्या नावाने
PSC
घेणे आवश्यक आहे. लाकडी साहित्याचे धुरीकरण केले
नाही किंवा लागडी साहित्यामध्ये किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव आढळून
आल्यास
Consignment
रद्द होवू शकते.
निर्यातदारानी लाकडी पॅकींग मटेरियल खरेदी करताना व त्याद्वारे
पॅकींग करताना खालील प्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे.
१.
लाकडी साहित्यास साल नसली पाहिजे.
२.
वाळवीचा प्रादुर्भाव नसला पाहिजे.
३.
बोरर किड/बुरशीचा प्रादुर्भाव नसला पाहिजे.
४.
जंगली लाकडाची भेसळ नाही. याची खात्री करणे
५.
अधिकृत पॅकरकडून योग्य प्रतीचे लाकूड खरेदी केले पाहिजे.
६.
लाकडी पॅकींग मटेरियलला
Methyl
Bromide
चे
fumigation
अधिकृत परवानाधारक
operator
कडूनच करुन घेतले पाहिजे.
७.
लाकडी पॅकींग मटेरियलची साठवणूक योग्यरित्या केली पाहिजे. |